राज्य सरकारने या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही कागदपत्रे ही जाहीर केलेली होती. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड हे लागणार आहे आणि अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड वरील नावाप्रमाणेच अर्ज करायचा आहे.
लाभार्थी यादी मधून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे
दुसरं कागदपत्र म्हणजे तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे. जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पंधरा वर्षांपूर्वी चे राशन कार्ड, 15 वर्षांपूर्वीची शाळा सोडल्याचा दाखला, पंधरा वर्षांपूर्वीचे जन्म प्रमाणपत्र, अशा कोणत्याही एका कागदपत्राचा वापर करू शकता.
वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख असल्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणे आवश्यक आहे. हे जर असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही.
जर नव विवाहित असेल, तर तिचे नाव राशन कार्डवर नसणार आहे. त्यामुळे पतीचे रेशन कार्ड म्हणून उत्पन्नाचा दाखला पात्र आहे. तुम्हाला बँक खात्याची तपशील सुद्धा द्यावे लागतील. त्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. महिलेचे हमीपत्र आणि फोटो जोडणे आवश्यक आहे.