पोखरा योजनेअंतर्गत नवीन अर्ज भरणे झाले सुरू

महाराष्ट्र सरकार मार्फत राबविल्या जाणाऱ्या पोखरा या योजनेअंतर्गत सध्या विविध वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत, तरी आज आपण या लेखात पोखरा योजनेअंतर्गत कोणत्या घटकांसाठी अर्ज सुरू आहेत ? तसेच अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील व अर्ज कसा करावा ? या विषयीची माहिती पाहणार आहोत.

पोखरा योजनेअंतर्गत सध्या सुरू असलेले वैयक्तिक लाभाचे घटक :

तुषार सिंचन संच

ठिबक सिंचन संच

वैयक्तिक शेततळे

गांडूळ खत युनिट

विहीर पुनर्भरण

रेशीम उद्योग

गोड्या पाण्यातील मत्स्य पालन

शेळीपालन

फळबाग लागवड

अशा प्रकारच्या विविध घटकांसाठी पोखरा योजनेअंतर्गत अर्ज भरणे सुरू आहे.

अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड

बँक पासबुक

सातबारा उतारा

8अ उतारा

इत्यादी.

पोखरा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा :

पोखरा योजनेचा अर्ज भरण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पोखरा योजनेसाठी घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज करू शकता.

अर्ज भरण्यासाठी – येथे क्लिक करा

Leave a Comment