शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्याचा शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे. प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना सरकार देणार आहे ? या विषयीची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.
हे देखील वाचा : 34 लाख शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज होणार माफ
राज्यातील शेतकऱ्यांना 2019 यावर्षी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात आली होती. त्यानंतर जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकार मार्फत 2019 यावर्षी घेण्यात आला होता. परंतु प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान वाटप करण्यासाठी आता पर्यंत सरकार मार्फत निधी मंजूर करण्यात आला नव्हता.
तरी आता प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान वाटप करण्यासाठी शिंदे सरकारने 5 हजार कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान जमा केले जाणार आहे. राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.