10वी आणि 12वी परीक्षेच्या निकालाची संभाव्य तारीख 15 मे जाहीर केली जात आहे. मात्र, त्यापूर्वी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी मिळाव्यात यासाठी मंडळाने यंदा परीक्षा वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे लवकरच निकाल जाहीर करण्याची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी.