आता भूमी अभिलेखाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आता यानुसार राज्यातील बारा तालुक्यांमध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक सातबारा नुसार प्रत्येक जणांचा नवीन पोट हिस्सा तयार करून याचबरोबर त्यांच्या जमिनीचा नवीन नकाशे तयार करून हे नकाशे त्यांच्या सर्वे क्रमांकावर जोडले जाणार आहेत आता यामध्ये आपण पाहिलं तर जो प्रत्येक सर्वे क्रमांक आहे.
या प्रत्येक सर्वे क्रमांकातील प्रत्येक जणांचे सर्वेक्षण करून जमिनीच्या मोजणी करून हे नवीन नकाशे तयार केले जातील यामुळे नवीन सातबारा तयार करून या सोबत नवीन नकाशे देखील उपलब्ध केले जाणार आहेत आता यामध्ये आपण पाहिलं तर ना हदीवरून ना जमिनीची खरेदी विक्री करताना सातबारा ला जमीन हद्दी नकाशे असल्यामुळे कोणताही वाद निर्माण होणार नाही. आणि याच बरोबर जे सातबारावरील दुसरे बाकी जे जमीन धारक किंवा खातेदार आहेत यांची परवानगी सुद्धा लागणार नाही यामुळे देखील वाद टळतील
आता यामध्ये पाहिलं तर हा जो प्रयोग राज्यातील बारा तालुक्यांमध्ये सर्वात आधी केला जाणार आहे आणि नंतर संपूर्ण राज्यामध्ये हा निर्णय लागू केला जाईल आणि या निर्णयामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकाच उत्तरावर जे अनेक खातेदार असतात यांची पोट हिस्से केल्यामुळे कोणत्याही शासकीय काम किंवा जमीन खरेदी विक्री अशा कामांसाठी गैरसोय होणार नाही.
जमीन हद्दी नकाशे कशासाठी आहेत महत्त्वाचे?
आता जेव्हा एखादा पोटीसदार स्वतःची जमीन विक्री करायचं ठरवतो आणि त्याला जर विक्री करायची असेल तर त्याला सातबारा वरील सर्व खातेदार असतात त्यांची परवानगी घ्यावी लागते आणि याच बरोबर जर जमीन मोजणी करायचे असेल तरीही या सर्व खातेधारकांची संमती ही गरजेचे असते आणि यामुळे या नियमानुसार खरेदी विक्री यामध्ये सुद्धा अनेक बंधने तयार होऊन वाद निर्माण होतात आणि यामुळे अनेक प्रकरणे हे कोर्टात जातात आता या नवीन नियमानुसार आता खरेदी विक्री करताना याचबरोबर नवीन नकाशे असल्यामुळे बांधावरून सुद्धा आता वाद निर्माण होणार नाही.