karj mafi maharashtra : सरसकट कर्जमाफी झाली जाहीर, शासन निर्णय आला । कर्जमाफी यादी पहा ।

शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. तरी आज आपण या लेखात, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे ? या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
शेतकरी बऱ्याच वेळा शेती कामांसाठी सरकारी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कर्ज घेतात. हे कर्ज सरकार मार्फत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाते.

राज्यात 2014 ते 2017 या वार्षिक कालावधीत पाऊस कमी पडत होता, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. शेतातील पीक वाया गेल्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात आला होता. ज्या शेतकऱ्यांनी सरकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून शेती कामांसाठी पीक कर्ज घेतले होते, त्या शेतकऱ्यांना बँकेचे पीक कर्ज परतफेड करणे शक्य नव्हते तसेच अगोदरचे थकीत पीक कर्ज परतफेड केले नसल्यामुळे बँकांकडून नवीन पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळत नव्हते.

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय 2017 या वर्षी घेतला होता. त्या कर्जमाफी योजनेला सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव दिले होते. या कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार होता. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी सरकारने 18 हजार कोटी रुपये इतका निधी मंजूर केला होता. तसेच जे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या जाहीर करून त्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात येत होते. परंतु कर्जमाफीसाठी जी वेबसाईट तयार केली होती त्या वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे राज्यातील 6 लाख शेतकरी कर्जमाफी योजने पासून वंचित राहिले. त्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे, असे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले आहे.

कर्जमाफी लाभार्थी यादी पाहण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा

Leave a comment